नवी दिल्ली : निवडणूक आयोगावर मागील काही दिवसांपासून आरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता कॉकरोच जनता पार्टीने निव़डणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासाठी सीजेपीने मोर्चाची घोषणा केली आहे. या संदर्भात काल सीजीपीने मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आंदोलन केले. यानंतर कॉकरोच जनता पार्टीने थेट दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीतील आंदोलनापूर्वी देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये निदर्शने करण्याच्या मूळ रणनीतीत बदल करत, कॉकरोच जनता पार्टीने आता थेट १० ऑक्टोबर रोजी राजधानीतील जंतरमंतरवर धडक देण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी जंतरमंतरवर आंदोलनाला बंदी घातल्यास सीजेपीने आक्रमक पवित्रा घेतला असून, पोलीस आम्हाला जिथे अडवतील, त्या जागेलाच आम्ही जंतरमंतर बनवून तिथेच आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीकडून या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची घोषणा करताना सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी सुरुवातीला देशव्यापी मोहिमेचे आवाहन केले होते. दिल्लीत पोहोचण्यापूर्वी हे आंदोलन देशभरातील विविध शहरांतून पुढे नेले जाईल, असा त्यांचा मूळ आराखडा होता. मात्र, आता संघटनेने आपल्या रणनीतीत मोठा बदल केला असून, मुंबईनंतर इतर शहरांतील दौरे रद्द करून थेट दिल्लीवर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्क येथील आंदोलनानंतर दीपके यांनी १० ऑक्टोबर रोजी थेट जंतरमंतरवर मोर्चाची घोषणा केली. सीजेपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आशुतोष रांका यांनी दिली असली, तरी मूळ योजना बदलून अचानक थेट दिल्ली गाठण्यामागचे कारण मात्र संघटनेने अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे.
१० ऑक्टोबर रोजी जंतर मंतरवर जाण्याची घोषणा
मुंबईतील आंदोलनानंतर लगेचच कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांनी दिल्लीला जाण्याची घोषणा करत आंदोलनाची तारीख जाहीर केली. ङ्गङ्घमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर देशभरातून कार्यकर्ते दिल्लीत दाखल होतील आणि १० ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर आंदोलन छेडले जाईल,ङ्घङ्घ असा इशारा दीपके यांनी दिला. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि महात्मा गांधींच्या मार्गानेच होईल, असे स्पष्ट करत ते पुढे म्हणाले, आमच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकाराचा आदर करायचा की २० जुलैच्या पोलीस अत्याचाराची पुनरावृत्ती करायची, हे आता केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनीच ठरवावे.
जंतर मंतरवर आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
नीट पेपरफुटीच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर कोणत्याही आंदोलनाला परवानगी न देण्याचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारीही मशिदींच्या मुद्द्यावरून आंदोलन करणार्या संघटनांसह ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ङ्गङ्घदिल्ली पोलिसांनी आम्हाला जंतरमंतरकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास, ते आम्हाला जिथे अडवतील त्याच जागेचे रूपांतर आम्ही नव्या जंतरमंतरमध्ये करू आणि तिथेच आंदोलन ठोकून देऊ,ङ्घङ्घ असा इशारा दीपके यांनी दिला आहे.